Baipan Bhari Deva Lyrics From Baipan Bhari Deva is marathi song sung by Saiprasad Nimbalkar & Female Chorus with music given by Sai-Piyush while lyrics are written by Valay Mulgund.

Baipan Bhari Deva Lyrics

घड्याळाच्या काट्यावर कसरत तारेवर
घड्याळाच्या काट्यावर कसरत तारेवर

नवऱ्याची मर्जी राख
मुलबाळ सासू भार
जीवघेण्या गर्दीला या
भीडतांना आर पार

जीव तुझा भात्यापरी
रोज होई खालीवर
ठिणगीला भीडणारी आकल

बाईपण भारी देवा
बाईपण भारी रं

बाईपण भारी देवा
बाईपण भारी रं
बाईपण भारी देवा
बाईपण भारी रं

अरे संसार संसार
जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके
तवा मिळते भाकर

झिजवते टाचा रोज
तोंडभर खाचा रोज
रांधा वाढा, उष्टी काढा
तालावर नाचा रोज

रोज नवे रंग फासून
हसतेस दुःखावर
स्वप्न रोज तासून तू
ठेवतेस गाडाभर

जीव तुझा भात्यापरी
रोज होई खालीवर
ठिणगीला भीडणारी आकल

बाईपण भारी देवा
बाईपण भारी रं

बाईपण भारी देवा
बाईपण भारी रं
बाईपण भारी देवा
बाईपण भारी रं

ता न ना ना, ता न ना ना..

ओलांडून उंबरठा
वाट नवी शोधते
भेदून तू संकटांना
घाट नवा कोरते

रोज नव्या आकाशात
तळपती वीज तू
काळोखात अंकुर ते
प्रकाशाचे बीज तू

जीव तुझा भात्यापरी
रोज होई खालीवर
ठिणगीला भीडणारी आकल

बाईपण भारी देवा
बाईपण भारी रं

बाईपण भारी देवा
बाईपण भारी रं
बाईपण भारी देवा
बाईपण भारी रं

स्वतःसाठी सबुरी घे
तुझ्या रंगी रंगुनी घे
तुझ्यातल्या विश्वासाने
जग सारे जिंकूनी घे

नवे जूने सारे बंध
जोडतेस मोती-माळ
सुखासाठी जन्मभरी
तूच आनंदाची नाळ

जीव तुझा भात्यापरी
रोज होई खालीवर
ठिणगीला भीडणारी आकल

बाईपण भारी देवा
बाईपण भारी रं
बाईपण भारी देवा
बाईपण भारी रं

बाईपण भारी देवा
बाईपण भारी रं
बाईपण भारी देवा
बाईपण भारी रं