Song: Dharmantar
Album: Dharmantar
Singer: Milind Shinde
Music: Harshad Shinde
Lyrics: Dilraj Pawar
Music Label: T-Series

Dharmantar Lyrics

नागांच्या त्या नागपुरात चंद्रमणी सवे लाखो जनात
त्या दीक्षा भूमीवर भीमानं केलय धर्मांतर ।। धृ ।।
मंगल सोहळा दिन सोन्याचा प्रकाशित हो झाला
लाखो जणांचा दलित मेळा बुद्धचरणी नेला
मंगल सोहळा दिन सोन्याचा प्रकाशित हो झाला
लाखो जणांचा दलित मेळा बुद्धचरणी नेला
छप्पन झाली हर्ष भरात चंद्रमणी सवे लाखो जनात
त्या दीक्षा भूमीवर भीमानं केलय धर्मांतर ।। १ ।।
येवले ठायी गर्जना केली भीमानं धर्मांतराची
उजाडली ती रम्य पहाट दलित दिक्षांतराची
येवले ठायी गर्जना केली भीमानं धर्मांतराची
उजाडली ती रम्य पहाट दलित दिक्षांतराची
बुद्धाची वाणी गावुन मुखात चंद्रमणी सवे लाखो जनात
त्या दीक्षा भूमीवर भीमानं केलय धर्मांतर ।। २ ।।
अशोकानंतर फिरविले ते चक्र त्याने धम्माचे
बुद्धंन सरणं मंत्र गायीला दर्शन दिले बुद्धाचे
अशोकानंतर फिरविले ते चक्र त्याने धम्माचे
बुद्धंन सरणं मंत्र गायीला दर्शन दिले बुद्धाचे
सोन लुटलंय घराघरात चंद्रमणी सवे लाखो जनात
त्या दीक्षा भूमीवर भीमानं केलय धर्मांतर ।। ३ ।।
नागपुरात या जीवनाचं सार्थक झालं माझं
बुद्धचरणी लिन झाले हर्षदा दिलराज
नागपुरात या जीवनाचं सार्थक झालं माझं
बुद्धचरणी लिन झाले हर्षदा दिलराज
घेऊनि ती जिद्द उरात चंद्रमणी सवे लाखो जनात
त्या दीक्षा भूमीवर भीमानं केलय धर्मांतर ।। ४ ।।
नागांच्या त्या नागपुरात चंद्रमणी सवे लाखो जनात
त्या दीक्षा भूमीवर भीमानं केलय धर्मांतर ।। धृ ।।